Top News महाराष्ट्र वाशिम

शेतकऱ्यांचा 15 नोव्हेंबरपर्यंत पीकविमा मंजूर करा अन्यथा…; खासदार भावना गवळींचा इशारा

वाशिम | परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास माघारी घेतला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार भावना गवळी वाशिम जिल्ह्यात नुकसानग्रस्त पीकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पीकविमा कंपन्यांना इशारा दिला आहे.

राज्य सरकार तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमादेखी काढला आहे. मात्र विमा कंपनीकडून उडवाउडवीची त्यांना उत्तरे दिली जात असल्याचं भावना गवळी यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांचा 15 नोव्हेंबरपर्यंत पीकविमा मंजूर करा अन्यथा जिल्ह्यातील पीकविमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसैनिक मोर्चा काढणार असून कार्यालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा भावना गवळी यांनी दिला आहे.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील वारा, अनसिंग, कुभी या भागातील पीकांची पाहणी भावना गवळी यांनी केली. शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचंही गवळी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“खडसे आणि महाविकास आघाडीतील पक्ष मिळून भाजपचे राज्यातील वर्चस्व कमी करू”

मुंबई, महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची; मुख्यमंत्र्यांचा कंगणावर हल्लाबोल

“देवेंद्र फडणवीस लवकर बरे व्हा, आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान हवा आहे”

दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का?- नितेश राणे

राज्यातील तरूणांनी उद्योगधंद्याकडे वळावं; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या