पुणे | सालाबादप्रमाणे या वर्षीही दि. 8 ऑक्टोंबर 2019 रोजी महात्मा फुले सांस्कृतीक भवन, शिवरकर रोड, फातिमा नगर वानवडी, पुणे येथे राज्यस्तरिय मराठा दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. या वर्षी आर्थिक शिक्षण व भविष्यातील फायदे, विद्यार्थी दशेतून उद्योजकतेकडे, उद्योग व नोकरीमधील संधी आदि. विषयांवर अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन मिळणार आहे.
मराठा सेवक समितीच्या वतीने करण्यात आलेली तयारी पूर्ण झालेली असून महाराष्ट्रातील तमाम मराठा तरुण-तरुणींनी व बंधु-भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा सेवक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा समाजातील युवा वर्गाला त्यांच्या जवळ असलेल्या गुणांच्या माध्यमातून उन्नतीकडे घेऊन जाण्यासाठी मागील 3 वर्षांपासून मराठा दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते.
मेळाव्यात मिळालेल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन मराठा सेवक समितीच्या वतीने शासकीय व सामाजिक कार्यातून शिक्षण, शेती, व्यवसाय, नोकरी क्षेत्रांमध्ये अनेक युवक युवतींना सहकार्य पुरवण्यात आलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“बाळा सावंत घरचा माणूस, भावनिक नातं तोडू नका”
–https://t.co/ImCnBApdgF #म— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
पुण्यात एकाच वेळी दोन ठाकरी तोफा धडाडणार!- https://t.co/lmExwyXA2d #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
“आंदोलकांचा आवाज दाबू पाहणाऱ्या भाजप-सेना सरकारला कोर्टाची सणसणीत चपराक” https://t.co/L7NyBsFVqz @AshokChavanINC @BJP4Maharashtra @Shivsena #Aarey
— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
Comments are closed.