बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बापानं केलं असं काही की, अरबाज मर्चंटने मारला डोक्यावर हात; पाहा व्हिडीओ

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) कथित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर केला आहे. आर्यन बरोबर त्याचा मित्र अरबाज मर्चंटला (Arbaaz Merchant) देखील जामीन मिळाला आहे. ड्रग्ज पार्टीत पकडलेल्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. (Arbaaz Merchant slapped his head)

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अरबाज मर्चंट शुक्रवारी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात पोहोचला होता. यावेळी अरबाज मर्चंटसोबत त्याचे वडील अस्लम मर्चंटही होते. एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावून अरबाज मर्चंट बाहेर आला.

त्यावेळी त्याचे वडील कार्यालयाबाहेर उभे होते. अरबाज बाहेर आल्यावर काहीसा निराश दिसत होता. अशातच अरबाज बाहेर आल्यावर वडील अस्लम मर्चंट यांनी अरबाजला कॅमेऱ्यासमोर उभं केलं. त्यावेळी त्याला उभ्या असलेल्या पत्रकरांना कोणताही फोटो देण्याची इच्छा नव्हती. त्यावेळी संतापलेल्या अरबाजने थेट डोक्यालाच हात मारला.

दरम्यान, घडलेल्या या घटनेमुळे अस्लम मर्चंट आपल्या पोराला प्रसिद्धी देयची होती का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. अरबाज सोबतच आर्यन देखील आठवड्याची हजेरी लावण्यासाठी एनसीबीच्या कार्यालयात पोहचला होता.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

…अन् राज्यपाल म्हणाले,”मी आजच्या आज राजीनामा देतो”

‘बिग बुल’ झुनझुनवालांना जोर का झटका! झालं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

आत्ताची सर्वात मोठी बातमी! राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

आणीबाणी जाहीर! ‘या’ शहरात कोरोनाने माजवला हाहाकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More