बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सैराटमधल्या सल्याची दिलदारी; हजारो कुटुंबांना केली मदत!

सोलापूर |   सैराटमध्ये अप्रतिम अभिनय साकारून परश्या-अर्चीएवढाच लक्षात राहिलेलं पात्र म्हणजे सल्या उर्फ अरबाज शेख… कोरोनाच्या या कठीण काळात त्याने आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

प्रथमत: सचिन अतकरी गरजू लोकांना धान्य तसंच गरजेच्या गोष्टीचं वाटप करत होते. त्यानंतर सचिन आणि सल्याची फेसबुकवरून ओळख झाली. मग सुरू झाला मदतीचा आणि गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा प्रवास…!

‘वी विल वीन’ या सेवाभावी संस्थेच्या मदतीने अरबाज गावातील गरजूंना अन्नधान्य वाटप करत आहे. फक्त अन्नधान्य वाटपापूरतंच अरबाजचं काम नाहीये तर गावातील प्रत्येक घरात जाऊन त्यांच्याकडे रेशनकार्ड आहे की नाही याची तो खात्री करून घेतो. रोजगार गेल्यावर तुम्ही तुमची गुजराण कशी करताय हे तो त्यांना विचारतो.

एका दिवसाला कमीत कमी 50-60 घरं फिरून त्यातील अतिशय गरजू लोकांच्या मदतीची यादी तो तयार करतो. यानंतर तो धान्याचं किट तयार करतो. अन स्वत: तो गरजूंच्या घरी अन्नधान्य वाटप करतो.

दरम्यान, अरबाजचं काम पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरतं आहे. अरबाजने केलेल्या मदतीमुळे अनेक लोकांना दिलासा मिळाला आहे तर त्यांनी अरबाजचे आभार देखील मानले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

संवेदनशील छत्रपती; बळीराजाचं दुःख न पाहवल्याने राजेंनी स्वतः तिफन ओढली! पाहा व्ही़डिओ

सरकारचा खासगी लॅबला दणका; कोरोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात घेतला मोठा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

बुधवार पेठेतील महिलांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

पुण्यात आज 163 रूग्णांना डिस्चार्ज… पाहा नव्या किती रूग्णांची नोंद

उद्या मुख्यमंत्री रायगडला जाऊन चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना मदतीचं वाटप करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More