Arbaz Patel Girlfriend l यंदाच्या वर्षीच्या ‘बिग बॉस मराठी’चा 5 वा सिझन प्रचंड गाजला आहे. या सिझनला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रेम दिलं आहे. अशातच या सिझनमध्ये सर्वात गाजलेले स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. या दोघांच्या नात्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मात्र अशातच आता त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. परंतु दुसरीकडे बिग बॉसच्या घराबाहेर अरबाज पटेल हा लीझा बिंद्रा नावाच्या एका मुलीला डेट करत आहे. त्यामुळे आता निक्की तांबोळीसोबतची जवळीक पाहून अरबाजच्या गर्लफ्रेंडने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे.
बिग बॉसच्या घरात टिकण्यासाठी लव्ह अँगलचा वापर करू नकोस :
‘भाऊचा धक्का’ या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने देखील अरबाजला निक्कीवरून खडसावलं होतं. त्यावेळी रितेश म्हणाले होते की, अरबाज बिग बॉसच्या घरात टिकण्यासाठी लव्ह अँगलचा वापर करू नकोस. कारण अरबाज हा रिअॅलिटी शो स्टार आणि स्प्लिट्सविला हा शो करून आलेला आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या घरात निक्की आणि अरबाज या दोघांचे मिठी मारतानाचे आणि किस करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
निक्की तांबोळीबद्दल अरबाजच्या मनात असलेल्या भावनांवरून रितेश देशमुखनेही त्याची चांगलीच शाळा घेतली होती. मात्र यावेळी देखील रितेशने अरबाजच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केला होता. अशातच आता निक्कीसोबत अरबाजच्या जवळीकच्या चर्चेदरम्यान आता लिझा बिंद्राने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
Arbaz Patel Girlfriend l लिझाने सोशल मीडियावर दिली प्रतिक्रिया :
या संपूर्ण प्रकरणावर लिझा बिंद्राने एका ओळीत प्रतिक्रिया दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, ‘मित्रमैत्रिणींनो.. कृपा करून अरबाजच्या बाबतीत मला मेसेज किंवा कमेंट अजिबातही करू नका. कारण बिग बॉसच्या घरातील अरबाज आणि निक्की यांच्यातील जवळीक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लिझा बिंद्राला टॅग करण्यास सुरुवात केली होती.
मात्र या गोष्टीला वैतागून लिझाने अशी पोस्ट लिहिल्याचं कळतं आहे. लिझा बिंद्राच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अरबाजसोबतचे बरेच फोटो आणि व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. इतकंच नव्हे तर एका पोस्टमध्ये तिने अरबाजला ‘पती’ असं देखील म्हटलं आहे.
News Title : Arbaz Patel Girlfriend Leeza Bindra Post
महत्त्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! मरीन ड्राइव्हवरुन वांद्रे आता फक्त ‘इतक्या’ मिनिटांत गाठता येणार
सोन्याने दिली स्वस्ताईची वार्ता, ‘इतका’ घसरला भाव; जाणून घ्या आजचे दर
भाजपला मोठा धक्का, समरजितसिंह घाटगे ‘तुतारी’ फुंकणार; आज होणार जाहीर पक्षप्रवेश
1 सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या बहीणींना किती लाभ मिळणार?, 4500 की फक्त1500?
मोठी बातमी! हवाई दलाचं मिग 29 विमान कोसळून मोठा स्फोट; पाहा Video