मुंबई| एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. नुकतंच एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री अर्चना नार्वेकर यांनी त्यांच्या आयुष्यातला जीवन प्रवास सांगितला.
सोबतच सिनेसृष्टीत आलेले चांगले वाईट अनुभव त्यांनी सांगितलं. मुलखात सुरु असताना अर्चना म्हणाल्या की, मी जेव्हा शूटींगला जायची तेव्हा माझी बहिण सुप्रिया पाठारे ही माझ्यासोबत यायची. त्यातूनच तिला अभिनयाची संधी मिळाली. मला चार बहिणी होत्या. त्यामुळे माझे वडील मानसिकरित्या फार खचले होते. मी पाच ते सहा वर्षाची असताना माझ्या वडिलांचे निधन झालं. त्यामुळे मला मोठ्या कष्टाला सामोरं जावं लागलं, असं त्यांनी सांगितलं.
मी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला लागले. मी शाळेत शिकत असताना नीलकांती पाटेकर आणि सुलभ देशपांडे यांनी मला बालकलाकार म्हणून नाटकात काम करण्याची संधी दिली. तसं मी करियरमध्ये सुपरस्टारच होते असं काही नाही. मला सिनेसृष्टीत सगळी चांगली माणसं मला भेटत गेली. त्यामुळे चांगली कामं मला मिळाली आणि माझा चेहरा ओळखला जाऊ लागला, असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं.
दरम्यान, एकदा एका हिंदी चित्रपटासाठी माझी निवड झाली होती. तो चित्रपट खूप मोठा होता. तुमचे फोटो पण चांगले आहेत. तुम्ही हा चित्रपट करताय, पण या चित्रपटात काम करायचं असेल तर तुम्हाला चार दिवस या चार लोकांसोबत राहावं लागेल, अशी अट त्यांनी घातल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी मुलाखतीत बोलताना केला.
थोडक्यात बातम्या-
“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”
हॉटेल मालकाने अडवल्यानंतर सदाभाऊ खोत संतापले; राष्ट्रवादीला दिला गंभीर इशारा
‘चहापावडर सरकार उधारीवर घेतंय’ सांगत मंत्र्याने नागरिकांना केलं चहा कमी पिण्याचं आवाहन
‘अवो आयका माझं, बापाला फोन करा माझ्या’; चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
‘शरद पवार हो म्हणाले असते तर…’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.