‘त्यात काय लपवण्यासारखं आहे’, आर्चीनं केला बाॅयफ्रेंडबद्दल खुलासा

मुंबई| 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट'(Sairat) चित्रपटानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. अजूनही या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांंमध्ये कायम आहे. या चित्रपटातील कलाकारांनाही प्रेक्षकांची अमाप पसंती मिळाली.

मराठीत सांगितलेलं कळत नाय का इंग्लिशमध्ये सांगू काय, असं म्हणत आर्चीनं म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूनं(Rinku Rajguru) सैराट चित्रपटाून मराठी सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री केली. यानंतर तिनं काही चित्रपट आणि वेबसिरीजमध्येही काम केलं.

रिंकूचे आता असंख्य चाहते आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यास तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. रिंकूला बाॅयफ्रेंड आहे का, असा प्रश्नही अनेकांना पडत असतो.

परंतु काही दिवसांपूर्वी रिंकू एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती की, अजूनतरी माझ्या आयुष्यात कोणता मुलगा नाही. ज्या दिवशी माझ्या आयुष्यात कोणी येईल, त्या दिवशी मी जाहीर करेन. त्यात लपवण्यासारखं काय आहे, असंही रिंकू म्हणाली होती.

दरम्यान, सैराटमधील परश्या म्हणजेच आकाश ठोसर(Akash Thosar) आणि रिंकूनं खऱ्या आयुष्यातही एकत्र यावं, अशी इच्छा नेटकरी व्यक्त करत असतात.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More