बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रत्येकाला ओमिक्राॅन होणार का???; WHOने दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिकेतून समोर आलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा आता भारतात धूमाकूळ पाहायला मिळत आहे. डेल्टा व्हेरिएंटलाही ओमिक्रॉनने मागे टाकलं आहे. त्यातच आता भारतासह अनेक देशांमध्ये ओमिक्रॉ़नचा उपप्रकार BA.2 चे काही प्रकरण समोर येत आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून काही सल्ले देण्यात आले आहेत.

डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेमध्ये ओमिक्रॉन कमी घातक आहे. परंतु, मागील व्हेरिएंटप्रमाणेच ओमिक्रॉन विषाणूही गंभीर आजारी पाडू शकतो, असं  जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकारी मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितलं आहे. तसेच ज्या लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे, त्या लोकांना गंभीर आजारी पडण्याचा धोका कमी नाही हे मारिया व्हॅन यांनी नमूद केलं आहे.

काही लोकांना ओमिक्रॉनची लक्षणे असतात तर काहींना ओमिक्रॉनची लक्षणे जाणवत नाहीत. त्या लोकांना गंभीर आजार किंवा मृत्युचा धोकाही असू शकतो. तसेच मारिया यांनी सांगितलं आहे की, जे लोक पूर्वीच्या काही आजारांनी ग्रस्त आहेत किंवा ज्या लोकांनी अजूनही लसीकरण केलेलं नाही, त्या लोकांमध्ये कोरोना गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकारी मारिया व्हॅन यांना सर्वंच लोक ओमिक्रॉन संसर्गाचे बळी पडू शकतात का? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर ओमिक्रॉन डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेमध्ये अधिक  संसर्गजन्य असल्याचं सांगितलं. जगभरामध्ये ओमिक्रॉनच्या अधिक केसेस समोर येत असल्या तरी देखील सर्वांनाच ओमिक्रॉनची बाधा होईल, असं म्हणता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं. महामारी अजून संपलेली नाही त्यामुळे हलक्यात घेवू नका, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर, डाॅक्टर म्हणतात…

“…त्यानंतर विराटने लग्न करायला पाहिजे होतं”, शोएब अख्तरने किंग कोहलीला डिवचलं

नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे युतीमधून…”

नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं! फक्त 30 मिनिटात जमवले 10 लाख अन्…

सतत आजारी पडताय? मग आहारात करा ‘या’ तीन गोष्टींचा समावेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More