बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुण्यातले गरीब झोपडीधारक सेलिब्रिटी नाहीत म्हणून भाजपवाले गप्प आहेत का?”

पुणे | स्थानिकांच्या विरोधानंतर देखील पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. काही जणांनी तर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणात हस्तक्षेप करत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले.

पुण्यातले गरीब झोपडीधारक सेलिब्रिटी नाहीत म्हणून भाजपवाले गप्प आहेत का? भर पावसाळ्यात मध्यरात्री पासून कारवाई कोणाच्या आदेशाने केली? बिल्डरच्या? की भाजप शासित पुणे मनपाच्या?, असा सवाल करत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेससोबत शिवसेनेने देखील पुण्यातल्या केलेल्या कारवाईवर आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून पुणे महापालिकेवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

आंबिल ओढा परिसरात राहणाऱ्या या लोकांना विस्थापित करण्यात येणार आहे, त्यांचं पुनर्वसन करण्याचं कोणतंही रेकॉर्ड न्यायालयासमोर नाही, त्यामुळे लोकांना उद्ध्वस्त करणं उचित ठरणार नाही, त्यामुळे या लोकांचं जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत पुणे महापालिकेच्या तोडकामाच्या कारवाईला स्थगिती देत आहोत. पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती असेल, असा आदेश न्यायालयानं दिला आहे.

दरम्यान, पुणे महापालिका भाजपच्या सत्तेत असल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजपवर टीका करण्याची आयती संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या विषयावर भाजप कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी करावी”

“एरव्ही महापौर मोहोळ मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहोचतात, पण…”

‘बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा’; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

‘…तर कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसची गरज नाही’; ICMR च्या रिसर्चमधून महत्वाची माहिती समोर

पावसामुळं गंगेच्या पाणी पातळीत वाढ; किनारी वाळूत दफन केलेले मृतदेह बाहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More