बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्यास होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

नवी दिल्ली | अंघोळ (bath) हा आपला नित्यक्रम असतो. आपण रोज अंघोळ करतो. अंघोळीसाठी अनेकजण गरम पाण्याचा पर्याय निवडतात. तुम्हाला माहित नसेल मात्र खेळाडूंच्या अंघोळीसाठी बर्फाचं पाणी वापरलं जाते. अनेकदा बर्फाच्या पाण्यानं अंघोळ करण्याचा फायदा होत असल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे.

हिवाळ्यात (Winter) अनेकजण गरम पाण्यानं अंघोळ करतात. आता उन्हाळा सुरु झाला आहे त्यामुळं थंडपाण्यानं अंघोळ करत असाल तर बर्फाच्या पाण्याची अंघोळ हा चांगला पर्याय ठरु शकतो. बर्फाच्या पाण्याची अंघोळ तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. यामुळे अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळते.

शरीरातीच्या मांसपेशीमधील मेटाबोलिक (Metabolic) कमी करायचं असल्यास बर्फाच्या पाण्याचा चांगला उपयोग होतो. बर्फाच्या पाण्यानं अंघोळ केल्यास रक्तवाहिन्या(Blood vessels)आकुंचन पावतात आणि सामान्य वातावरणात आल्यावर त्या पुन्हा प्रसारण पावतात. यामुळे मेटबोलिक कमी होण्यास मदत होते. थंड पाणी स्ट्रेस रिस्पाॅनसला ट्रिगर(Stress response triggers) करते यामुळं मानसिक स्वास्थदेखील सुधारतं.

बर्फाच्या पाण्यामुळं रक्तवाहिन्या आकुंचन (Contraction) पावतात. यामुळे सूज,जळजळ यासारखा त्रास कमी होण्यास मदत होते. बर्फाच्या पाण्यानं अंघोळ केल्यानं रोगप्रतिकारक शक्ती (immune system) वाढते. अतिशय थंड पाण्याच्या अंघोळीमुळं मज्जासंस्थेवर (nervous system) सकारात्मक परिणाम होतो. यामुळे झोपदेखील छान लागते.

शरीर डिटाॅक्स (Detox) करण्यासाठी बर्फाच्या पाण्याची अंघोळ चांगला पर्याय ठरु शकते. थंड पाण्यामुळं शरीरातील विषारी पदार्थ, घाण आणि अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते. अनेक विषाणूंना देखील मारुन टाकते. थंड पाण्यामुळं त्वचेची छिद्रे घट्ट होऊ शकतात आणि ते केस मजबूत करण्यासदेखील थंड पाण्याची मदत होते.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More