बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बेजबाबदार वागायला आम्ही काय संजय राठोड आहोत का?”

मुंबई | मराठी राजभाषा दिना निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज स्वाक्षरी मोहिम राबवली. पण राज्य सरकारने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवसेना विरूद्ध मनसे असा सामना रंगताना दिसत आहे.

मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम योग्य खबरदारी घेऊन पार पाडू, बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड आहोत का?, असा टोला मनसेचे नेते आणि पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

मनसे नेत्यांना सीआरपीसी 149 अंतर्गत नोटीसा देण्यात आल्या आहेत. तरीही मनसे नेते कार्यक्रम घेण्यास आग्रही आहेत. या कार्यक्रमात अनेक मराठी कलाकार देखील उपस्थित राहणार आहे. एकीकडे मनसे आता निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्याच बरोबर मनसेने मराठी राजभाषा दिनानिमित्ताने राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजीत केले गेले आहे.

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी कोरोनासंबंधी नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. कोरोनाच्या भीतीने राज्य सरकारने मुंबईतील ओव्हल मैदान बंद ठेवलं आहे. मात्र मैदान बंद ठेवल्याने कोरोना कमी होणार नाही. राज्य सरकारने याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करावा, असा सल्लाही देशपांडे यांनी सरकारला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मुंबईत कोरोना बळावतोय- आनंद महिंद्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर…

“नगराळे यांचं वक्तव्य ज्यांना धक्कादायक वाटतं ते मुर्खांच्या नंदनवनात फिरतायेत”

धक्कादायक! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

महिलेची संजय राऊतांविरोधात हायकोर्टात धाव; केले ‘हे’ गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More