“छत्रपतींची पगडी घालण्यासाठी आपण पात्र आहोत का???”

दापोली :  राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू आहे. आज ही यात्रा कोकणातल्या दापोली शहरात पोहचली. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

डोक्यावर छत्रपतींची पगडी घालण्याआधी आपण त्यासाठी पात्र आहोत का, याचा विचार केला का?, अशी बोचरी टीका मिटकरींनी केली.

डोक्यावर छत्रपतींची पगडी घालायला आपण त्यासाठी पात्र असायलं हवं. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आपण राबवायला पाहिजेत, महिलांना न्याय द्यायला हवा. आपण तर हे काही केलं नाही, असं मिटकरी म्हणाले. गुरूवारी महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित नाशिकमध्ये झाला. यावेळी उदयनराजेंनी छत्रपतींची मानाची पगडी पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर चढवली आणि त्याचं स्वागत केलं.

उदयनराजेंनी मोदींचं स्वागत केलं खरं पण महाराष्ट्र भाजपने ज्यावेळी मोदींचं स्वागत केलं त्यावेळी उदयनराजे मात्र लांब उभे राहिले होते. हाच फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राजे हे सगळं बघून वेदना होतायेत, असं म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-