बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही बिनबापाचे आहात काय?…”; संजय राऊतांची राणेपुत्रांवर जहरी टीका

मुंबई | शिवसेना आणि भाजप यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. अशात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून त्यांनी राणे, राणेपुत्र आणि संपूर्ण भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. त्यावर आता याआधी नितेश राणेंनी संजय राऊतांना आपला बाप कोण आहे हे माहित नाही. राऊत हे लावारीस आहेत, अशी जहरी टीका राऊंतावर केली होती. त्यानंतर आता पुन्हा संजय राऊत यांनी राणेपुत्रांवर जहरी टीका केली आहे.

नारायण राणेंच्या राजकीय कारकीर्दीचे सर्वात जास्त नुकसान त्यांच्या मुलांनीच केलं आहे. टीका करणे आणि त्या टीकेचा स्वीकार करणे ही आपल्या लोकशाहीची परंपरा आहे. ठाकरेंपासून ते गांधींपर्यंत, पवारांपासून ते मोदींपर्यंत सगळ्यांचा बाप काढत असतात. त्यांनीच त्यांच्या वडिलांचे नुकसान केलंय. एक दिवस देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर हीच वेळ आणतील असं राऊतांनी म्हटलं आहे.

राणे आणि त्यांचे मुले सतत इतरांचे जाहीरपणे बाप काढत असतात. तुम्ही काय बिनबापाचे आहेत का? असा प्रश्नच एक दिवस भाजपचे लोक तुम्हास विचारतील त्यावेळेस तेव्हा ते काय उत्तर देतील? राज्याच्या राजकारणातील अशे गढूळ प्रवाह लवकर थांबले नाहीत तर महाराष्ट्राची बदनामी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर व्यक्तींवर धोरणात्मक टीका करणे ठिक आहे. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. पण, राणे आणि त्यांची मुले राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल ज्या भाषेचा वापर करतात तो भाजपच्या नविन संस्कृतीचा उदय आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपला अस्वस्थता आणि अस्थिरतेची वाळवी लागेल. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून ज्या गोष्टी घडवल्या जात आहेत, त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणाऱ्या नाहीत. सत्ता नसल्यानं भाजप अस्वस्थ आहे, हे त्याचं दु:ख समजू शकतो. पण राज्याच्या महान व्यक्तीसह संस्कृतीवर हल्ला करणं योग्य नाही, असं अग्रलेखात म्हटलं होतं

थोडक्यात बातम्या –  

आता अजित पवार यांच्याबद्दल नारायण राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची दहशत, ‘या’ पाच जिल्ह्यांनी महाराष्ट्राचं टेंशन वाढवलं!

…तर सरकारने अनिल परब यांना स्वत: हून अटक करावी- चंद्रकांत पाटील

भाविनाने इतिहास रचला, टेबल टेनिसमध्ये सिल्वर मेडल पटकावलं

“संस्कार आणि संस्कृती इतरांनी पाळायची, स्वतःवर आलं की हात वर करायचे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More