बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुमचं वजन वाढतयं का?, वजन कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा

मुंबई | अनेक लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. मात्र, अनेक उपाय केल्याने वजन कमी होत नाही. तुमच वजन कमी करायचं असेल तर कडूलिंब हे अधिक फायदेशीर ठरू शकते. कडू लिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने शरिर निरोगी ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो.

कडूलिंबामध्येही अँटीबॅक्टेरिअल आणि अँटी सेप्टीक गुणधर्म असतात. कडूलिंबाच्या पानाचे सेवन केल्यास चयापचय वाढतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. कडूलिंबाच्या काढ्याचे सेवन केल्याने शरिरामध्ये चरबी जमा होत नाही. तसेच कडूलिंबामध्ये रोगप्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात असल्याने हा काढा अधिक फायदेशीर ठरू शकतो.

कडूलिंबाच्या काढ्याचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकते. कडूलिंबाचा काढ्याचे काही दिवस सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते. तसेच कडूलिंब त्वचेच्या आजारावर देखील परिणामकारक आहे. कडूलिंब शरिरामध्ये ऊर्जा निर्माण करत असल्याने तीव्र ऊर्जानिर्मिती होण्यास मदत होते. भारतीय आयुर्वेदामध्ये कडूलिंबाचं नाव हे सर्व प्रकारच्या आजारांवरील औषध म्हणून घेतलं जातं.

दरम्यान, रक्तशुद्धीकरणासाठी कडूलिंब फायदेशीर आहे. कडूलिंब हे शरिराच्या भागाला आवश्यक पोषक तत्व, ऑक्सिजन देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. शरिरातील हानिकारक आणि दुषित पदार्थांपासून सुटका मिळवण्यासाठी कडूलिंबाची मदत होते. तसेच डायबिटीस, कॅन्सर, मलेरिया या रोगांवरही कडूलिंब प्रभावी आहे.

थोडक्यात बातम्या- 

अभिमानास्पद! इस्राएलमधील रस्त्याला देणार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव

धक्कादायक! रात्री उशीरापर्यंत मोबाईल वापरल्यावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट, डाॅक्टर म्हणाले…

प्रियंका गांधीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, “वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी…”

…म्हणून सलमान आणि शेहनाजला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More