तुम्ही Toxic Friendship मध्ये आहात का?; ‘या’ 4 मार्गांनी पडा बाहेर

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आणि हृदयात प्रत्येक नात्याची वेगळी जागा असते. यातलं महत्त्वाचं म्हणजे मैत्रीचं (Friendship). ज्याला आयुष्यात खरे, चांगले मित्र मिळाले, तो खरा श्रीमंत असं आपण म्हणतो. म्हणजे मैत्री हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. (4 Ways To Deal With That Toxic Friend)

आपल्या जीवनात एक तरी आपला हक्काचा मित्र असतो ज्याच्यावर आपला प्रचंड विश्वास असतो. कोणत्याही मुखवट्याशिवाय तुम्ही त्याच्यासोबत किंवा तिच्यासोबत तुमच्या मनातील गोष्टी शेअर करू शकता. पण कधी कधी काही जणांशी मैत्री करणं आपल्यासाठीच त्रासदायक ठरतं. म्हणजेच तुम्ही Toxic Friendship मध्येही असू शकता.

आता तुम्ही Toxic Relationship ऐकलं असेल पण Toxic Friendship हे काय असतं? आणि Toxic Friendship मध्ये आहात हे कसं ओळखाल. तसेच जर असाल तर यातून बाहेर कसं पडाल? हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Toxic Friendship म्हणजे काय?

जो मित्र आपल्याला नेहमी टोचून बोलतो किंवा वारंवार आपल्याला हर्ट होईल अशा गोष्टी बोलतो. तसेच आपल्याला मिळालेल्या यशाचं ज्याला फारसं कौतुक किंवा आनंद वाटत नाही. फक्त त्याचं काम असेल तरच तुमच्याशी गोड बोलतात आणि जे मागून पाठीत वार करतात. म्हणजे जे तुमच्या पाठीमागे बोलतात, असे मित्र तुमच्याही आयुष्यात असतील तर तुम्ही Toxic Friendship मध्ये आहात असं समजा.

जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही Toxic Friendship मध्ये आहात तेव्हा अशा लोकांपासून तुम्ही 4 मार्गांनी लांब राहू शकता. पहिला मार्ग म्हणजे त्यांच्या कृती आणि शब्दांबद्दल त्यांचा सामना करा. म्हणजेच त्यांना जाणीव करून द्या की ते चुकतायेत आणि तुम्हाला देखील ते कळतंय. पण त्यांना ही गोष्ट तुम्ही नम्रपणे सांगा.

दुसरा मार्ग म्हणजे संबंधित व्यक्तिशी तुम्ही जाऊन थेट बोला. तुमची मैत्री फार जुनी असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन थेट बोलणं आणि त्यांना समजावणं हा चांगला पर्याय आहे. त्यांच्या वाईट वागण्यामागचं कारण किंवा तुमच्या बद्दल समोरच्याच्या मनात असलेला राग नक्की का आहे? हे आधी समजून घ्या. हे समजून घेतल्यास तुम्हाला तुमची मैत्री वाचवता येऊ शकते.

तिसरा मार्ग म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीशी बोलणं कमी करू शकता. ते जेव्हा तुम्हाला दुखावतील त्यानंतर त्यांच्याशी बोलणं कमी करून संपर्क तोडा. त्यांचे फोन घेणं किंवा जास्त बोलणं तुम्ही टाळू शकता.

तुम्ही समजावून किंवा त्यांच्याशी बोलून देखील ती व्यक्ती तुम्हाला दुखावत असेल तर मैत्री पूर्णपणे तोडणं हाच शेवटचा पर्याय तुमच्याकडे असू शकतो. तुमच्या स्वतःच्या मानसिक शांततेसाठी अशा मैत्रीपासून लांब राहा आणि शक्य असेल तर ही गोष्ट समोरच्या व्यक्तीला देखील थेट सांगून संपर्क तोडा.

महत्त्वाच्या बातम्या-