मुंबई | हाथरस बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी वसईत जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला. भाजपचे नेते रामदास कदम यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
हाथरस प्रकरणावरून काँग्रेसचे नेते आंदोलनं करत आहेत. पण त्यांचा खरा हेतू आता समोर आला आहे. बलात्काराची घटना ही निंदनिय आहे. पण वसईमध्ये हाथरस प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे, असं म्हणत राम कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
हाथरस पीडितेबद्दल तुम्हाला खरंच काही वाटत आहे की फक्त प्रसिद्धीसाठीच असे स्टंट केले जात आहे, असा सवाल राम कदम यांनी काँग्रेसला विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
इरफान पठाणचा पुन्हा धोनीला अप्रत्यक्ष टोला, म्हणाला…
‘मुली ऊसाच्या शेतातच का सापडतात?’, हाथरस प्रकरणावरुन भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, देशातील लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जा- राहुल गांधी
सरकार आणि जनतेला मास्क कंपन्यांनी लुटलं, ‘इतक्या’ कोटींचा नफा कमावला