बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी जेवढ्या उंचीची तेवढी लायकी ठेवा नाहीतर मला भेटायला यायचं नाही- पंकजा मुंडे

बीड | नवनियुक्त केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकांसोबत संवाद साधण्यासाठी जनआर्शीवाद यात्रेची सुरूवात केली आहे. भागवत कराड यांनी जनआर्शीवाद गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरूवात केली.

या घोषणांमुळे पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकलेल्या दिसल्या. मी शिकवलं आहे का तुम्हाला असं वागायला, मुंडे साहेब अमर रहे या घोषणा आम्ही रोखू शकत नाही. काय अंगार-भंगार लावली आहे, मला शोभत नाही हे वागणं. जेवढ्या उंचीची तेवढी लायकी ठेवा स्वत:ची नाहीतर मला भेटायला यायचं नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

भागवत कराड यांनी समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं आणि यात्रेला सुरू़वात केली. केंद्रामध्ये निवड झालेले नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील यांची निवड झाली आहे. 16 ऑगस्टपासून राज्यात जनआर्शीवाद यात्रा काढण्यात आली आहे.

दरम्यान, या जनआशीर्वाद यात्रेमध्ये कपील पाटील 570 किलोमीटर प्रवास मिळणार आहे. नारायण राणे यांची यात्रा 19 ऑगस्टला मुंबईमधून सुरूवात होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं अवघड करू”

मोठ्या भावाला वाचवण्यासाठी छोट्या भावाची पाण्यात उडी; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

“फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली द्यायची?”

आकाशाकडे बोट दाखवत कोहली थेट रिषभ पंतवर भडकला; पाहा व्हिडीओ

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More