बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कपडे वाळत घालण्यावरुन झालेल्या भांडणाने गाठलं टोक; घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

चंदिगड | कपडे वाळत घालण्यावरुन झालेल्या भांडणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना ही पंजाबमधील गुरुदासपूरमधील आहे.

गुरुदासपूर गावातील राहिवासी असणाऱ्या जसवीर कौर आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रीटा या दोघींमध्ये एकाच भिंतीवर कपडे वाळत घालण्यावरून भांडण झालं. हे भांडण बराच वेळ सुरू होतं. त्यानंतर ते इतकं विकोपाला गेलं की दोघींमध्ये मारामारी सुरू झाली. यामध्ये जसबीर कौर जखमी झाल्या.

जसबीर जखमी झाल्यामुळे दोन्ही कुटुंबात जाोरदार भांडणं लागली. दोन महिलांच्या भांडणादरम्यान धक्काबुकी झाली आणि जसबीर खाली पडल्या, अशी माहिती गावच्या सरपंचानी पोलिसांना दिली. जसबीर जखमी होताच त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात तपास झाल्यानंतर जसबीर पुन्हा घरी परतली. मात्र त्याच दिवशी सायंकाळी जसवीर यांचं डोकं दुखू लागल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस ठाणे तिब्बडचे अधिकारी कुलवंत सिंह यांनी रुग्णालयात जाऊन जसवीर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जसवीर यांचे प्रेत शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आलं असून आम्ही नातेवाईकांकडे चौकशी करून पुढील तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी कुलवंत सिंह यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

राजस्थानमधील अनोखा विवाह! बलात्काराच्या आरोपीने पीडितेशी पोलीस ठाण्यातच बांधली लगीनगाठ

‘माझी विकेट फक्त…’; या मराठी अभिनेत्रीच्या फोटोवर केलेल्या ‘खास’ कमेंटमुळे ऋतुराज गायकवाड चर्चेत

भावाच्या लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून घेतले ऑक्सिजन सिलेंडर, 25 कोरोना रुग्णांना जीवनदान

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गायब?; दिल्ली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल

“देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना ‘ती’ लस कशी दिली जाते”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More