BJP | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंंबईतील भाजपच्या (BJP) दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे स्वपक्षीय आमदार गणेश नाईक यांच्यावर तुटून पडल्या आहेत. त्यांना गणेश नाईकांना थेट इशारा दिला आहे.
ऐरोलीमध्ये यांना सगळे सोडून गेले म्हणून आता बेलापूर मतदारसंघावर यांचा डोळा आहे. पण लोकांना सगळं समजतं. कोण मेहनत करतं आणि कोण आयत्या जागेवर येतं. ही बाब मतदार जाणतात, अशा शब्दांत म्हात्रे यांनी नाईकांना सुनावलं आहे.
भाजपच्या 2 आमदारांमध्ये वादाचा भडका
बेलापूरमध्ये सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयासाठी निविदा प्रक्रिया सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत म्हात्रेंनी नाईकांचा समाचार घेतला. स्वत: काम करायचं नाही आणि मी काम करायला गेले की त्यात खो घालायचा.
पालिकेनं निधी दिला नाही म्हणतात. मग तुम्ही काय करत होतात. तुम्ही तर पालकमंत्री होतात. तुम्हाला का निधी आणता आला नाही, असा सवाल म्हात्रे यांनी नाईकांना विचारला आहे.
BJP | “…अन्यथा मग भांडाफोड करावा लागेल”
रुग्णालयाचं काम सुरु झालं आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल. या कामात आडकाठी आणू नका. अन्यथा मग भांडाफोड करावा लागेल, असा इशारा त्यांनी नाईकांना दिला आहे. कोविड काळातल्या फाईल माझ्याकडे आहेत. किती लॅबमध्ये कुठे कुठे गेले? सगळ्या फाईल आहेत. काढू का कोविड काळातली एक तरी फाईल? कोविड काळात कोणी पैसे लुटले? असा सवाल करत म्हात्रेंनी नाईकांवर निशाणा साधला.
दरम्यान, ऐरोलीची जागा शिंदेसेनेला सुटण्याची शक्यता असल्यानं नाईक यांनी मंदा म्हात्रेंच्या बेलापूर मतदारसंघात तयारी सुरु केली आहे. गणेश नाईक यांच्या मुलालादेखील विधानसभेचं तिकीट हवं आहे. त्यामुळे म्हात्रे आणि नाईक यांच्यात ठिणग्या पडू लागल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेच्या मुलाला फायदा होण्यासाठी… भाजप आमदाराकडूनच शिंदेंना तडाखे
मी कधीच भाजपमध्ये जाणार नाही!; रवी राणांनी बावनकुळेंची ॲाफर धुडकावली
राज्यातील भाजप नेत्यांकडून एकनाथ खडसेंची अवहेलना, मोठा निर्णय घेणार!
पुण्यात चाललंय तरी काय?, 12 तासात रंगला दुसऱ्या खुनाचा थरार
‘वनराज… तुला पोरं बोलवून ठोकतेच’; पोलिसांसमोर धमकी दिलेली ती कोण?