बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…मग आर्यन खान दोषी कसा? त्याला पकडणं हा एक ट्रॅप”

मुंबई | राज्यासह देशात गाजत असणारं आर्यन खान प्रकरणा सध्या दररोज नवीन वळण घेत आहे. 2 ऑक्टोबरपासून आजपर्यंत या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. आतापर्यंत आर्यन खानतर्फे तीन वकीलांनी न्यायालयात बाजू मांडली आहे. आज उच्च न्यायालयात  झालेल्या सुनावणीत आर्यन खानतर्फे भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली आणि अनेक खुलासे केले आहेत.

आर्यन खानला क्रुझवर पार्टीसाठी अरबाजनं बोलावलं होतं. त्याच्याकडं साधं सुद्धा ड्रग्ज सापडलं नाही. तो गेस्ट म्हणून त्या पार्टीला गेला होता. तो आणि आरबाज क्रुझजवळ गेलं तेव्हाच एनसीबीनं त्यांना अटक केली. त्यांच्याकडं काहीच सापडलं नसताना एनसीबीनं कारवाई केली आहे, असं न्यायालयात युक्तीवाद करताना रोहतगी म्हणाले आहेत. आर्यन खानला अटक करण्याचं कोणतंच कारण नव्हतं असंही रोहतगी म्हणाले आहेत.

आर्यन खाननं ड्रग्जचं सेवन केलं नव्हतं. त्याच्या मित्राकडं 6 ग्रॅम ड्रग्ज सापडलं त्यासाठी आर्यन खान दोषी कसा असा सवालही रोहतगी यांनी उपस्थित केला आहे. आर्यन खानचं मेडिकलही केलं गेलं नाही. आर्यनचं स्टेटमेंट घेतलं गेलं ते ज्या प्रकारे घेतलं गेलं त्यामुळं ते ग्राह्य धरता येणार नाही. आर्यनला पकडणं हा एक ट्रॅप असल्याचंही रोहतगी म्हणाले आहेत. आर्यन खानला या प्रकरणात केवळ लक्ष्य केलं जात आहे, असंही रोहतगी म्हणाले आहेत.

दरम्यान, आर्यन खानवर 27(A) लावण्यात आलं नसल्याचंही रोहतगी यांनी आर्यनची बाजू मांडताना म्हटलं आहे. परिणामी आता आर्यन खान प्रकरणात अजुन मोठे खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

थोडक्यात बातम्या 

“नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या”

बँकेची कामं आटोपून घ्या! पुढील महिन्यात बँका 17 दिवस बंद

“त्यांच्या सांगण्यावरून मलिक आरोप करतायेत, पुरावे असतील तर न्यायालयात जा”

“बिडीची जेवढी किंमत महाराष्ट्रात आहे तेवढी सुद्धा ईडीची राहिली नाही”

दिवाळीपूर्वी खवय्यांसाठी खूशखबर! ‘या’ गोष्टींच्या किंमतीत मोठी घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More