बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मैदानात घातला पंचाशी वाद! ‘या’ भारतीय खेळाडूवर कारवाईची शक्यता

नवी दिल्ली | क्रिकेट या खेळाला आपल्याकडे भावनेशी जोडण्यात येतं. भारत हा क्रिकेट चाहत्यांचा सर्वात मोठा देश आहे. क्रिकेटची अर्थव्यवस्था भारताच्या कमाईवर चालते, असं म्हटलं जातं. परिणामी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचीच नजर असते. क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडू (Player) आणि अंपायर (Umpire) यांच्यात वाद होणं काही नवं नाही पण या वादाचं परिणाम थेट खेळाडूच्या भविष्यावर होवू शकतो.

सध्या भारताचा प्रमुख संघ न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तर भारतीय अ संघ हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. न्युझिलंडविरूद्धची मालिका संपताच भारताचा प्रमुख संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. परिणामी तिथे सध्या उपस्थित असणाऱ्या भारतीय अ संघातील खेळाडूंची चर्चा जास्त होत आहे.

भारत अ (India-A) संघाच्या सामन्यादरम्यान भारतीय फिरकीपटू राहुल चहर (Rahul Chahar) हा अंपायरशी भांडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सामना चालू असताना राहुलनं अंपायरकडं एलबीडब्यूची (LBW) अपिल केली पण अंपायरनं काहीच प्रतिक्रिया न दिल्यानं राहुलनं आपला चष्मा अंपायरच्या दिशेनं भिरकावला आहे. परिणामी हा वाद आता वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मैदानावर खेळाडूंच्या वर्तवणूकीबाबत आयसीसीकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राहुल चहर पुढील सामन्यात खेळणार का नाही?, हा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात आहे.

थोडक्यात बातम्या 

संप मिटण्याची शक्यता! कर्मचारी आणि सरकारमध्ये चर्चेस पुन्हा सुरूवात

मोठी बातमी! कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटूंबियांना राज्य सरकारची मदत जाहीर

“जेव्हा मुंबईत हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते”

“23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता…”

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More