जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची जबरदस्त ऑफर

मुंबई | टेलीकॉम जगतात जियोच्या एन्ट्रीनंतर जिओला टक्कर देण्यासाठी सर्व कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. त्यासाठी एअरटेलने भारतात नवा प्रीपेड प्लान लॉन्च केलायं.

एअरटेलने 398 रुपयांमध्ये नवा प्लान बाजारात आणलाय. या प्लाननुसार एअरटेल ग्राहकांना दिवसाला 1.5 जीबी 3जी/4जी डेटा मिळणार आहे. तसंच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दिवसाला 90 एसएमएस मिळणार आहेत.

या प्लानची वैधता 70 दिवसांची असणार आहे. अनलिमिटेड कॉलिंगमध्ये लोकल, एसटीडी, नॅशनल रोमिंग या सुविधा असणार आहे. एअरटेलच्या सर्व ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, एअरटेलमध्ये 399 रुपयांचा प्लानही आहे. मात्र तुलनेनं या प्लानमध्ये 398 रुपयांइतक्या ऑफर मिळत नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या-

-रावण महात्मा; रावण दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी

-दक्षिण भारतापेक्षा मला पाकिस्तान अधिक जवळचा- नवज्योत सिंग सिद्धु

-राम कदमांचा व्हीडिओ; मतदार होण्यासाठी तरूणांना अमिष

-धनगर आरक्षणाच्या अडचणीत वाढ; धनगर आणि धनगड एक नाहीत!

-दलित-मराठा एकत्र आल्यामुळे भाजपने कोरेगाव-भिमा घडवलं!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या