बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण

मुंबई | देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. दिवसागणिक कोरोनाच्या रूग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. अनेक नेते मंडळी तसंच अभिनेते यांनाही कोरोनाची बाधा झालेली पहायला मिळाली. यामध्ये आता अजून एका प्रसिद्ध अभिनेत्याची भर पडली आहे.

अभिनेता अर्जून कपूर याला कोरोनाची लागण झाहे. अर्जूनने स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यामातून अर्जुनने त्याच्या चाहत्यांना यासंदर्भात सांगितलं आहे.

इन्स्टाग्रावर लिहिलेल्या पोस्टमध्ये अर्जुन म्हणतो, “माझं हे सांगणं कर्तव्य आहे की मला कोरोनाची लागण झाली आहे. माझी तब्येत बरी आहे आणि मला कोणतीही लक्षणं जाणवत नाहीयेत. डॉक्टरांच्या सल्लानुसार मी स्वतःला घरी आयसोलेट केलं आहे. सध्याचे काही दिवस कठीण असून तुमच्या प्रेमासाठी आणि सदिच्छांसाठी धन्यवाद.”

यापूर्वी महानायक अमिताभ बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन तसंच ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तर नुकतंच अभिनेता हिमांश कोहलीने देखील त्याला कोरोना झाल्याचं सोशल मिडीयाद्वारे सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

छोटा मासा गळाला लागलाय, रियाच्या भावाच्या अटकेनंतर शेखर सुमन यांची प्रतिक्रिया

…तर मी कंगणाची माफी मागण्याचा विचार करेन- संजय राऊत

“भाजप ही मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात”

पुण्यात मास्क न घालणाऱ्यांवर मोठी कारवाई; आतापर्यंत इतका दंड वसूल!

…तर भारतीय अमेरिकन नागरिकांचे मत आम्हाला मिळेल- डोनाल्ड ट्रम्प

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More