Top News

शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांनी ठरवलंय रावसाहेब दानवेंना पाडायचं म्हणजे पाडायचं!

जालना |  शिवसेना-भाजपचं युतीचं घोंगडं भिजत असताना शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी ठरवलंय भाजपच्या रावसाहेब दानवेंना लोकसभा निवडणुकीमध्ये पाडायचं म्हणजे पाडायचं, याचाच प्रत्यय काल पुन्हा एकदा आला.

रावसाहेब दानवेंना पराभूत केल्याशिवाय डोक्यावर केस उगवू देणार नाही, या शपतेची खोतकरांनी अब्दुल सत्तारांना आठवण करून देताना “सत्तार साहेब दोन महिन्यांनी काही दिवस का होईना पण तुम्हाला डोक्यावरची टोपी काढावी लागेल…!” असं सांगत दानवेंविरोधात शड्डू ठोकला.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांसमोरच खोतकरांनी ‘लोकसभा निवडणुकीत दानवेंना आव्हान देणार’, असं सांगितलं होतं. त्यावर ‘आपली ही घरातील भांडणं आहेत, चार-चौघात आणू नका’, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी खोतकर-दानवेंना दिला होता.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राला खोतकर-दानवे वाद नवा नाही. मात्र आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा वाद एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलाय.

महत्वाच्या बातम्या-

मावळमध्ये भाजपला नकोसे झालेत शिवसेनेचे श्रीरंग बारणे!

-नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा यवतमाळमध्ये?

हिंमत असेल तर निवडणुकीला उभं राहून दाखव, संजय काकांचं पडळकरांना खुलं आव्हान

“वेळेला आणि वेळेच्या शेवटी आम्ही दोघे भावंडं कायम सोबत असतो”

साताऱ्यात उदयनराजेविरोंधात शिवसेना डरकाळी फोडणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या