मुंबई | वादग्रस्त वक्तव्य केल्याने नेहमीच चर्चेत असणारे भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत शिवसेनेवर बोचरी टीका केली होती. यावर शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी राणेंचा समाचार घेतला आहे.
तुझी उंची किती आणि तू बोलतो किती, अशी खोचक टीका खोतकरांनी केली आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे यांना सर्व मिळाले आहे. असे उपरे कोल खाल्या मिठाला न जागणारे असतात. त्यामुळे अशा लोकांना गद्दार याशिवाय दुसरी उपमा देऊच शकत नाही, असं खोतकर म्हणाले आहेत.
वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?, असं म्हणत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून पहिल्यांदाच आरएसएसवर थेट टीका केली होती. यावर निलेश राणेंनी उत्तर दिलं होतं.
स्वर्गीय बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवली केली बाळासाहेबांनी, तो इतिहास लोकं विसरलेले नाहीत, अशी बोचरी टीका राणे यांनी केली होती.
ट्रेंडिंग बातम्या-
दैनिक ‘सामना’च्या पहिल्या महिला संपादक रश्मी ठाकरे
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यावर देशद्रोहाची तक्रार दाखल
महत्वाच्या बातम्या-
इंदोरीकरांच्या अडचणी वाढल्या; अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार?
जोपर्यंत जिभेला धार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढा सुरू राहिल- राजू शेट्टी
चित्रा वाघ… जरा हिशोबात; रूपाली चाकणकरांचा इशारा
Comments are closed.