मुंबई | झी मराठी वाहिनीवरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेतील छ. संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे भाग प्रदर्शित करु नयेत, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग वगळणार असल्याचं आश्वासन अभिनेता अमोल कोल्हे यांनी दिलं असल्याची माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने छळ केला. त्यांना ज्या यातना दिल्या गेल्या त्या पाहणं आम्हाला शक्य होणार नाही. राज्यातील समाजीक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे, अशी भीती खोतकरांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. महाराजांना औरंगजेबाने कैद केल्याचं दाखवण्यात आलंय. त्यानंतरचे दृश्य पाहणं मनाला पटणार नाही. या मालिकेचे चित्रीकरण रोखण्याबाबत मालिकेचे निर्मात्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली असल्याचं खोतकरांनी सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
ना जातीचे ना धर्माचे छ. शिवाजी राजे रयतेचे- श्रीपाल सबनीस
“आमच्या महाराजांचा जयजयकार करायला याला कमीपणा वाटतो का?”
महत्वाच्या बातम्या-
“…तर सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं नागरिकत्व रद्द होईल”
भाजपचा स्वभावच मूळात विरोधी पक्षाचा- सुधीर मुनगंटीवार
हे सरकार 5 वर्षे चालणार यात मला शंका वाटत नाही- शरद पवार
Comments are closed.