जालना | मागच्या वेळी युतीमुळे भाजपच्या उमेदवारांसाठी टेबल लावले होते, आता त्यांची वाट लावणार, असा इशारा राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी दिला आहे. ते बदनापूर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते.
मित्रपक्षाने आपली वाट लावण्याचे कारस्थान सुरु केलं आहे. याला मित्र म्हणावे की वैरी? असा सवाल त्यांनी केला आहे.
राज्यात युतीचे सरकार आहे. मात्र, शिवसेनेचे 2-3 मंत्री सोडले तर इतर मंत्र्यांना फारसे अधिकार नाहीत. त्यामुळे भाजपशी युती नको, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, रावसाहेव दानवे यांच्या विरोधात जालना लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“इंग्रजांच्या काळापासून मराठ्यांना आरक्षण,पण काँग्रेसनं ते काढून घेतलं”
“सरकारच्या नाही तर भारतातील 100 कोटी हिंदूंच्या जोरावर राम मंदिर बनेल”
-मराठवाड्याचा स्वतंत्र रणजी संघ हवा- धनंजय मुंडे
-लग्नानंतरही आशियातील सर्वात ‘सेक्सी’ दीपिकाच; प्रियंकाला टाकले मागे
फडणवीसांनी विश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली?- अनिल गोटे
Comments are closed.