IPLच्या लिलावाआधी अर्जुन तेंडुलकरनं दाखवला चमत्कार, एका षटकात 5 षटकार!
मुंबई | 2021 आयपीएलसाठी लवकरच बोली लागणार आहे, यंदाच्या बोलीचं खास आकर्षण आहे भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर… नुकत्याच झालेल्या काही स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती मात्र नुकत्याच खेळवल्या गेलेल्या पोलीस इन्विटेशन शिल्ड क्रिकेट स्पर्धेत त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे.
14 फेब्रुवारी रोजी ग्रुप ए कडून खेळताना त्याने अवघ्या 31 चेंडूंमध्ये 77 धावांची खेळी केली. फक्त फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीमध्येही त्याने कमाल दाखवली. 41 धावा देत त्याने 3 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. 21 वर्षीय अर्जुन तेंडुलकरने आपल्या या खेळी दरम्यान 5 चौकार आणि 8 षटकार लगावले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हाशीर दाफेदारच्या एका षटकात तर त्याने 5 षटकार लगावले.
फक्त सचिन नव्हे तर त्याच्या संघाकडून खेळणाऱ्या सलामीवीर केविन डीएलमेडाने 96 धावांची तर प्रगनेश खांडिलेवारने 112 धावांची खेळी केली. तिघांच्या या कामगिरीमुळे एमआयजी संघाने इस्लाम जिमखाना संघाचा 194 धावांनी पराभव केला.
नाणेफेक जिंकल्यानंतर एमआयजी क्रिकेट संघाने फलंदाजीचा पर्याय निवडला. अर्जुन, प्रगनेश आणि केविनच्या फलंदाजीच्या जोरावर त्यांनी 45 षटकात 7 गडी गमावून 385 धावांची भव्य धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल इस्लाम जिमखानाचा संघाला फक्त 191 धावा करता आल्या.
दरम्यान, लवकरच होणाऱ्या आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या खेळीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या, विजय हजारे चषकाच्या सराव सामन्यात त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नव्हती, त्यामुळे त्याला मुंबईच्या संघात स्थानही देण्यात आलं नव्हतं, मात्र या खेळीनं अर्जुनला आयपीएलमध्ये किती किंमत मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
उडता रहाणे! मराठमोळ्या अजिंक्यचा झेल सर्वांना अचंबित करणारा, पाहा व्हिडीओ
चिंताजनक! कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, पाहा सविस्तर आकडेवारी
‘…तर आज पूजा जिवंत असती’; पूजाच्या आजोबांची भावूक प्रतिक्रिया
“संजय राठोडसोबत तिचं नाव जोडू नका, आमच्या पूजाचे कोणासोबतही संबंध नव्हते”
“पूजा चव्हाण प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख गप्प का?”
Comments are closed.