देश

अर्जुनाच्या बाणामध्ये आण्विक शक्ती होती- राज्यपाल

कोलकाता | रामायणाच्या काळात आपल्याकडे विमाने होती. महाभारतामध्ये अर्जुनाच्या बाणामध्ये आण्विक शक्ती होती, असं वक्तव्य पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी केलं आहे. कोलकात्यामधील बिर्ला इंडस्ट्रीयल अ‌ॅण्ड टेक्नोलॉजिकल म्युझियमच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

महाभारतामध्ये संजय कुरुश्रेत्रातील युद्धभूमीपासून लांब असूनही धृतराष्ट्राला युद्धाची सर्व माहिती दिली. कारण संजयकडे दिव्यदृष्टीसारखी शक्ती होती. महाभारतामध्ये अर्जुनाच्या बाणामध्ये अण्विक शक्ती होती. तेव्हाच आपण इतके शक्तीशाली होतो. त्यामुळे भारताकडे दूर्लक्ष करणे जगाला परवडणारं नाही, असं धनकर यांनी म्हटलं आहे.

विमानांचा शोध 1910 किंवा 1911 च्या दरम्यान लागला. मात्र तुम्ही आपल्या वेदांचा अभ्यास केल्यास आपल्याकडे रामायणाच्या काळात उडणाऱ्या वस्तू विमाने होती असं लक्षात येईल. टीव्हीसारखी माध्यमे नसतानाही संजयने संपूर्ण महाभारत युद्ध ऐकलं, असं जगदीप धनकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे.

दरम्यान, भाजपाचे अनेक नेत्यांनी रामायण आणि महाभारताचा संदर्भ देत पुष्कर विमान आणि आधुनिक तंत्रज्ञान भारतीयांकडे अनेक शतकांपासून असल्याचा दावा केला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

अजित दादा, मी सदैव आपला आभारी राहीन- रितेश देशमुख

साध्वी प्रज्ञा यांना आलेल्या ‘त्या’ पत्राचं पुण्याशी कनेक्शन??

छत्रपतींच्या पुस्तकाचा वाद संपला, जुनी मढी उकरु नका- शिवसेना

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या