धक्कादायक! पोलीस निरीक्षक सुबोधकुमार यांना जवानाने गोळी घातली

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंग यांचा मृत्यू झाला होता. सुट्टीला आलेल्या एका जवानाने त्यांच्यावर गोळी घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जीतू उर्फ फौजी असं या जवानाचं नाव असून तो जम्मूमध्ये सैन्यादलात तैनात आहे. जीतू सुट्टी निमित्त गावी आला होता, त्यावेळी हा हिंसाचार घडला.

जीतूने त्याच्याकडं असलेल्या बेकायदेशीर पिस्तूलाने सुबोध कुमार यांच्यावर गोळी झाडत असल्याचा व्हीडिओ पोलिसांना मिळाला आहे.

दरम्यान, जीतू सध्या जम्मूमध्ये आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचं एक पथक जम्मूला रवाना झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…या कारणानं नितीन गडकरींना आली चक्कर !

-मिकाला अटक झाल्याने राखीला रडू कोसळलं; सोडवायला दुबईला जाणार

-‘आंबा’ प्रकरणात संभाजी भिडेंना दिलासा; 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

-लाडक्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी दाखवला अंगठा; पत्रातील मागणी फेटाळली

-मलबार हिलचं नाव बदलण्याची शिवसेनेची मागणी, हे नाव सुचवलं!