Top News

अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीच्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलली!

Photo- Youtube Video Screenshot

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी,  फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनादेखील अटक करण्यात आली. या तिघांनाही अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.

अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आरोपींच्या वकीलांकडून हायकोर्टात काही विषयांवर सुनावणी चालू असल्याचे पेपरवर्क सादर करण्यात आले. त्यानुसार पोलीस कोठडीवरील सुनावणी स्थगित करण्यात यावी अशी मागणी आरोपीच्या वकीलांकडून कोर्टाकडे करण्यात आली. त्यावर निर्णय देत कोर्टाने आजची सुनावणी स्थगित करत येत्या 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणीची तारीख दिली.

महत्वाच्या बातम्या-

…तर फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानात जाऊन कलम 370 लागू करावं- संजय राऊत

“उर्मिला मातोंडकर या स्पष्टवक्ता आहेत, त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल”

“आमचं आणि राज्यपालांचं एकमेकांवर प्रेम; 12 जणांची यादी ते नाही नाकारणार”

तज्ज्ञांच्या समितीपेक्षा सचिन सावंत यांना जास्त अक्कल आहे का?; आशिष शेलारांचा टोला

“…तर मी कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकलं असतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या