बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अर्णब गोस्वामींच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणी मुंंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून रिपब्लिक न्यूजचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी वादाच्या घेऱ्यात सापडले आहेत. टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी गोस्वामींविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात गोस्वामींवर विविध आरोप लावत त्यांना 19व्या क्रमांकाचा आरोपी बनवण्यात आलं आहे.

फसवणूक करणे, कट रचणे आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत गोस्वामींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर रिपब्लिक टीव्हीचे इतर पाच जण तर महामुव्हीच्या दोन जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे टीआरपी घोटाळा प्रकरण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये उघडकीस आलं होतं. हंसा रिसर्च ग्रुप (एचआरजी) मार्फत रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलने (बीएआरसी) याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. डुएल एलसीएनच्या माध्यमातून चॅनल एकापेक्षा जास्त क्रमांकावर दाखवून टीआरपी गैरमार्गाने वाढवल्याचा मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामींसह इतरांवर आरोप केला आहे.

दरम्यान, या टीआरपी घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांना समन्स देऊन बोलवा, असे आदेश हायकोर्टाने दिले होते. आता अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी केव्हा बोलावलं जाईल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“नरेंद्र मोदींना त्यांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करायचं नाही”

…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवता येईल – मोदी सरकार

सोन्याचा भाव आज पुन्हा उतरला, वाचा ताजे दर

काॅंग्रेसला बाजूला ठेवत राष्ट्रवादी तिसरा फ्रंट काढणार? पवारांच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण

“भाजपच्या ‘या’ नेत्याने फडणवीसांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More