Top News महाराष्ट्र रायगड

अर्णब गोस्वामींच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार!

रायगड | रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता अर्णव गोस्वामी यांच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता आहे.

रायगड पोलीस काल अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अर्णब गोस्वामी यांच्यासह त्यांच्या पत्नीने रायगड पोलिसांच्या कारवाईला विरोध करून त्यांना धक्काबुक्की केली होती.

रायगड पोलिसांच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावरूनच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामी यांना काल सकाळी मुंबई आणि रायगड पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती.

महत्वाची बातम्या-

“जसं सामना शिवसेनेचं मुखपत्र, तसं ‘ते’ भाजपचं चॅनेल”

सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे, शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

“सरकारने अर्णब गोस्वामींना अटक करून आणीबाणी सारखीच परिस्थिती निर्माण केली”

“रोहित शर्माच्या दुखापतीची सीबीआयद्वारे चौकशी करा”

नोव्हेंबर अखेरीस महाराष्ट्र पूर्णतः सुरु होईल- विजय वडेट्टीवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या