Top News महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींची सुटका की कोठडीत रवानगी???; पाहा न्यायालयानं दिलेला निर्णय

अलिबाग | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर अलिबाग न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीये.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिलीये. दरम्यान अर्णव गोस्वामी यांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास देखील किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलाय.

अर्णव गोस्वामी यांना पोलीस कोठडी देण्याची ठाकरे सरकारची मागणी केली होती. मात्र ठाकरे सरकारची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. अर्णव गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं असून मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे.

अलिबाग न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी घोषणाबाजी केली. निकालानंतर पोलिस व्हॅनमधून जात असताना त्यांनी ‘पोलीस कोर्ट मे हार चुकी है…’ अशी घोषणाबाजी केलीये.


महत्वाच्या बातम्या-

‘राजीनामा देण्यासाठी भाजपने 5 कोटी रुपये दिले होते’; ‘या’ माजी आमदाराचं वक्तव्य

अमिताभ बच्चन आणि ‘सोनी’ विरोधात भाजप आमदाराची पोलिसांत धाव

“सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध”

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ!

“शेतकऱ्यांसाठी एनडीए सरकारने जेवढं काम केलं तेवढं काम आतापर्यंत कुणीही केलं नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या