बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरजील उस्मानीला आणला का शोधून पाताळातुन?”

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. यानंतर नारायण राणेंना अटकही करण्यात आली. या प्रकरणावर अभिनेता आरोह वेलणकर यानं प्रतिक्रिया दिली आहे.

ते शरजील उस्मावर काय कारवाई झाली? सांगेल का कोणी? आणला का शोधून पाताळातुन? फक्त विचारतोय, असं म्हणत आरोहने पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. त्याने या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

शरजील उस्मानीनं एल्गार परिषदेत हिंदुत्वावर टीका केली होती. एल्गार परिषदेत त्याने धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पुण्यात स्वारगेट पोलिस ठाण्यात हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्याला अटक करण्यात आली नव्हती. या प्रकरणाची आठवण आरोह वेलणकरने पोलीस आणि सरकारला करून दिली आहे.

नारायण राणेंच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मला आश्चर्य वाटतं कि शर्जील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारत मातेला शिव्या देतो, हिंदुना खुनी म्हणतो त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक तुमच्यामध्ये नाही. त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता आणि आता नारायण राणेंच्या पकडण्यासाठी संपूर्ण पोलीस दल कामाला लागले आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य शोधलं, राडा होणार!

“सत्तर वर्षांची कमाई मोदींनी विकून टाकली”, पाहा राहूल गांधींचा व्हिडीओ

नितेश राणे पेटून उठलेत?, मध्यरात्री केलं हे ‘करारा जवाब’ देणारं ट्विट

गाढवाची गोष्ट सांगत अर्जुन खोतकरांची राणेंवर टीका, पाहा व्हिडीओ

“आता महाविकास आघाडी सरकारने मारत बसा माशा”, पाहा आठवलेंच्या भन्नाट कवितेचा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More