लोकांना कोट्यवधींचा गंडा घालून आणखी एक व्यावसायिक परदेशात फरार

कल्याण | विविध योजनांच्या माध्यमातून लोकांचे कोट्यवधी रुपये गोळा करुन डोंबिवलीतील एक सराफ फरार झाला आहे. तो दुबईत पळून गेल्याची शक्यता आहे. 

अजित कोठारी असं या सोनं व्यापाऱ्याचं नाव आहे. प्रथमेश ज्वेलर्स नावानं त्याचं सोन्याचं दुकान आहे. 

10 तोळ्यांच्या मोबदल्यात वर्षाला 2 तोळे निव्वळ व्याज, रोख रकमेच्या मोबदल्यात व्याज देण्याचं अमिष या सराफानं दाखवलं होतं. ़इतक्या मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या मोबदल्यामुळे लोकांनी आपली आयुष्यभराची पुंजी त्याला दिली होती. 

दरम्यान, याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर अजित कोठारीला शोधावे, अशी मागणी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-शहा हा पर्शियन शब्द; भाजपाध्यक्ष अमित शहांचं नाव बदलण्याची मागणी

-दिवाळीत बंद झालेलं भारनियमन पुन्हा सुरु होणार नाही; उर्जामंत्र्यांची घोषणा

-औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्यासाठी पाठपुरावा करु!

-भाजपऐवजी जेडीयूमध्ये का प्रवेश केला?; पाहा काय म्हणाले प्रशांत किशोर…

-सिंचन घोटाळा प्रकरण; अजित पवारांबाबतची भूमिका न्यायालयात मांडू- मुख्यमंत्री