बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘इयत्ता पाचवीवरील मुलांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करा’; शाळांना अजब आदेश

नवी दिल्ली | शिकागो येथील शाळांना एक अजब आदेश दिला आहे. पाचवीवरील मुलांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करण्यात यावी, असा आदेश येथील शाळांना दिला आहे. हा आदेश शिकागो पब्लिक स्कुल बोर्ड ऑफ एजुकेशन यांनी काढला आहे.

शाळांना वर्ग पाचवी ते त्यापेक्षा पुढील वर्गातील मुलांना मोफत कंडोम देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. हा आदेश काढण्यामागचे कारण शिकागो पब्लिक स्कुल बोर्ड ऑफ एजुकेशनने सांगितलं आहे. मुलांमधील लैंगिक आजार, एचआयव्ही संसर्ग आणि अनावश्यक गर्भधारणा रोखण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे.

कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय अंमलात आणण्यात आला नाही, असंही त्यांनी म्हंटलं आहे. या आदेशावर नागरिकांनी विरोध दर्शवला असून या आदेशाबाबत सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर या आदेशाबाबत एका युजरने संताप व्यक्त करत हा निर्णय मानसिक आजारपणाचं लक्षण असल्याचं म्हटलंय.

दरम्यान, मुलांना मोफत कंडोम देण्याच्या या आदेशामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या नवीन शालेय धोरणावर पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली. नवीन शालेय धोरणावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलीये.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या ‘कप्पा व्हेरियंट’चा धोका वाढला; उत्तर प्रदेशात कप्पामुळे पहिला मृत्यू

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ईडी कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार

“आता तिथे सुखाने रहा, पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका”

साहेब, राष्ट्रपती व्हावेत हीच माझी इच्छा- सीमा आठवले

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात?; उदय सामंत यांचं सुचक वक्तव्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More