Top News राजकारण

एमआयएमच्या ‘त्या’ 2 आमदारांना अटक करा; अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबई | भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एमआयएमच्या दोन आमदारांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि शेख आसिफ शेख रशीद या दोन आमदारांना अटक करण्यात यावी असं भातखळकर यांनी म्हटलंय.

बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारताचं नागरिकत्व मिळवून देणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केलीये. यांच्याकडून राज्यातील एमआयएमच्या दोन आमदारांची स्वाक्षरी असलेले लेटरहेड्स जप्त करण्यात आलीयेत. याच पार्श्वभूमीवर भातखळकरांनी ही मागणी केलीये.

यासंदर्भात भातखळकर यांनी ट्विट केलं आहे. ते म्हणालेत, “धक्कादायक! बांग्लादेशींना नागरिकत्व मिळून देण्यासाठी वापरले MIM च्या आमदारांचे लेटर हेड…देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेशी अत्यंत धोकादायक खेळ करणाऱ्या देश विघातक षड्यंत्राची कसून करा, देशद्रोह्यांना अटक करा.”

“MIM च्या आमदारांचा घातक खेळ…देश विघातक षड्यंत्राची कसून चौकशी झाली पाहिजे. लाचार ठाकरे सरकार हे प्रकरण खणून काढेल काय?”, असा सवाल देखील त्यांनी सरकारला केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अकरावी प्रवेश प्रकरणी राज ठाकरे यांचा वर्षा गायकवाड यांना फोन

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; रूग्णालयातून सोडलं घरी

गरज भासली तर भाजपला देखील पाठिंबा देऊ; मायावती यांचं मोठ विधान

कोचिंग क्लासेस सुरु करा; क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंची घेणार भेट

सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; शिवसेनेचा लक्ष्मण सवदींना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या