Top News देश

महिला पोलिसासोबत गैरवर्तन; मंत्र्याच्या मुलासह 2 जणांना अटक

गांधीनगर | महिला पोलिसासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. गुजरातमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मुख्य म्हणजे या अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक जण राज्यमंत्र्यांचा मुलगा असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात सरकारमधील राज्यमंत्री कुमार कनानी यांचा मुलगा आणि त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली. महिला पोलिसाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शिवाय त्यांनी कर्फ्यूचंही उल्लंघन केलं आहे. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

प्रकाश कनानी हा गुजरातचे आरोग्य राज्यमंत्री तसंच वराछा रोड मतदारसंघाचे आमदार कुमार कनानी यांचा मुलगा आहे. प्रकाश आणि त्याच्या मित्रांनी कर्फ्युमध्ये रोखलं म्हणून महिला पोलिसाशी गैरवर्तन केलं. महिला पोलीस सुनीता यादव यांच्यासोबत त्यांनी गैरवर्तन केलंय. याचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाला. यानंतर रविवारी पोलिसांनी राज्यमंत्री कनानी यांच्या मुलासह मित्रांना अटक केली.

ए-डिव्हिजनचे सहाय्यक पोलीस आयुक्त सी.के.पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, प्रकाश कनानी आणि त्यांच्या मित्रावर कलम 188, 269, 270 आणि 144 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता देखील करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

ज्योतिरादित्य शिंदेंचं सचिन पायलट यांच्यासाठी ट्विट, शिंदें म्हणतात…

हा घ्या पुरावा…RSS स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचा- चित्रा वाघ

सचिन पायलट यांना मोठा धक्का; परतलेल्या 3 आमदारांचं धक्कादायक वक्तव्य

शरद पवारांनी एनडीएमध्ये येऊन नरेंद्र मोदींसोबत काम करावं, केंद्रीय मंत्र्याचं निमंत्रण

संजय राऊतांचं भाजपला ओपन चॅलेंज; “हिंमत असेल तर महाराष्ट्रात ‘हे’ करुन दाखवा!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या