बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा”

मुंबई | राज्यभरात सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ माजवली आहे. त्यांच्या या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यानं राजकीय वर्तुळातील वातावरण तापलं आहे.

मी मोदीला (modi) मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला’ असं विधान काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. यावरुन राज्यभर खळबळ माजली आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर ट्विट करत नितीन गडकरी यांनी पटोलेंवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.

दरम्यान, देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्यावर आहेत. यावर आता पुन्हा नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी गावातील मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोलत होतो, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न नाना पटोलेंनी केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो आणि मारुही शकतो’; नाना पटोलेंच्या वक्तव्यानं खळबळ

पुढील 24 तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कार खाली उडी घेत आत्महत्या

“शरद पवारांचे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का?”

कोरोना नियम पाळून छत्रपती संभाजी महाराजांचा 342 वा राज्यभिषेक सोहळा थाटामाटात साजरा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More