Loading...

‘हिंदू पाकिस्तान’ शब्दामुळे शशी थरूर अडचणीत; कोर्टानं बजवालं वॉरंट

कोलकाता |  काँग्रेस नेते शशी थरूर यांनी लोकसभा निवडणुकीत ‘हिंदू पाकिस्तान’ हा शब्द वापरला होता. या वादग्रस्त वक्तव्यावर कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. कोलकातामधील एका महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे.

जर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर भारतात हिंदू पाकिस्तान होण्याची चिन्ह निर्माण होऊ शकते, असं शशी थरूर यांनी म्हटलं होतं. त्यांचं हेच वक्तव्य त्यांच्या अंगलट आलं आहे.

Loading...

भाजप एक नवं संविधान लिहीत आहे. ज्यामुळे भारताचा पाकिस्तानसारखा देश होण्याचा मार्ग मोकळा होईल. अशा हिंदू पाकिस्तानात अल्पसंख्यांकांच्या अधिकारावर गदा येईल आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा सन्मान मिळणार नाही, असंही त्यांनी तिरूवनंतपूरमच्या सभेत म्हटलं होतं.

दरम्यान, थरूर यांच्या वक्तव्यावर भाजपाने आक्षेप घेतला होता आणि तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-सांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी; पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

-पुण्यातील शिक्रापूरमध्ये महिलेचा विनयभंग, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

-लवासामुळे निसर्गाचा मुडदा पडला- संभाजी भिडे

Loading...

-आमदार महेश लांडगेंच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद!

-राज्यासाठी 6800 कोटी रूपयांची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार- मुख्यमंत्री फडणवीस

Loading...