बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री अमीषा पटेलविरोधात कोर्टाचं अटक वॉरंट

रांची | बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. अमीषा पटेलवर चित्रपट निर्माते अजय कुमार यांचा अडीच कोटींचा चेक बाउंस केल्याचा आरोप आहे. त्यावर सुनावणी करताना कोर्टानं हा निर्णय दिला आहे.

2018 साली ‘देसी मॅजिक’ हा चित्रपट करण्यासाठी अजय कुमार यांनी अमीषाला तीन कोटी रुपये उसणे म्हणून दिले होते. त्यानंतर अमीषाकडे ज्या-ज्या वेळी या पैशांची मागणी केली त्या-त्या वेळी तिनं पैसे देण्याऐवजी काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली, असा आरोप अजय कुमार यांनी केला आहे. अमीषा पटेल पैसे परत देत नसल्याने अजय कुमार यांनी कोर्टात धाव घेतली होती.

‘देसी मॅजिक’ हा चित्रपट पूर्ण होऊ न शकल्याने निर्मात्याने अमीषाकडे पैशांची मागणी केली. अमीषाने मोठ्या मुश्किलीने अडीच कोटींचा चेक दिला. परंतु, ज्यावेळी हा चेक बँकेत जमा केला तर तो बाउंस झाला. या चेक बाउंस प्रकरणी अमीषा विरुद्ध रांची कोर्टात पैशांची फसवणूक केल्याचा खटला सुरू आहे.

अमीषा पटेल विरोधात 11 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला होता. एका लग्नसमारंभात येऊन डान्स करण्यासाठी तिला ११ लाख रुपये देण्यात आले होते. परंतु, पैसे घेऊनही अमीषा लग्न समारंभात पोहोचली नाही. तसेच तिनं जे डान्स करण्याचे आश्वासन दिले होते ते पाळले नाही, असा तिच्यावर आरोप आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More