संजय राऊतांचं टेन्शन वाढवणारी बातमी!, …2 डिसेंबरनंतर अटकेची शक्यता!

नाशिक | शिवसेनेच्या ( Shivsena ) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.  मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयाने ( Malegoan district court) हे वॉरंट जारी केले आहे. संजय राऊत गैरहजर राहिल्याने न्यायलयाने वॉरंटचा आदेश दिला आहे. त्यांना 2 डिसेंबरला न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

मालेगावातील सुतगिरणी कारखान्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी  178 कोटींचा  घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्रातून केला होता. त्यांच्या आरोपांनंतर दादा भुसे यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. त्या प्रकरणात न्यायालयाने संजय राऊतांविरोधात जामिनपात्र वॉरंट जारी केले आहे.

दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात संजय राऊत न्यायालयात दोनदा गैरहजर राहिले. या अगोदर त्यांना  23 ऑक्टोबर रोजी मालेगाव येथील न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. दसऱ्या मेळाव्याचे कारण सांगत संजय राऊत त्यावेळी न्यायालयात गैरहजर राहिले होते. आज पुन्हा त्यांना न्यायालायत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र मराठा आरक्षणामुळे पुढाऱ्यांना गावबंदी असल्याचे कारण देत आजही ते न्यायालयात गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने संजय राऊतांविरोधात 50 हजार रुपयांचे जामिनपात्र वॉरंट जारी केले आहे, तसेच 2 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हजर न राहिल्यास अटकेची टांगती तलवार?

कोर्टाच्या वॉरंटचा सन्मान करणं बंधनकारक असतं. तुम्ही योग्य कारण देऊन न्यायालयाने परवानगीने अनुपस्थित राहू शकता किंवा पुढची तारीख घेऊ शकता, मात्र न्यायालयाचा अवमान करणं महागात पडू शकतं. प्रसंगी अटक करण्याचे आदेश न्यायालयानं याआधी दिलेले आहेत. त्यामुळे आता न्यायालयाने या प्रकरणात थेट वॉरंट काढल्याने संजय राऊत यांचं टेन्शन नक्कीच वाढलं आहे. पुढच्या सुनावणीला अर्थात 2 डिसेंबरला संजय राऊत गैरहजर राहिल्यास त्यांच्या अटकेची शक्यता आहे.

महात्त्वाच्या बातम्या –

‘अजित पवारांमुळेच…’; मीरा बोरवणकरांचा नवीन आरोप

मोठी बातमी! मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय 

‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा