कोल्हापूर | राज्यात आज अनेकांच्या घरी उत्साहात गणरायाचं आगमन झालं आहे. सध्या देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये त्यामुळे यंदा अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. तसेच गणेशाचे विसर्जनही कृत्रिम तलावात करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
कोल्हापूरच्या कागल येथील कोविड सेंटरमध्ये आज गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीची प्रतिष्ठापना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली.
कोविड केअर सेंटरमध्ये गणपती प्रतिष्ठापना हे राज्यातील पहिलेच उदाहरण असावे असा दावा यावेळी मुश्रीफ यांनी केला. त्यासोबतच विघ्नहर्त्याकडे त्यांनी कोरोनाचे संकट लवकर दूर कर, अशी प्रार्थनाही मुश्रीफ यांनी केली.
दम्यान, राज्यात अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत गणेश मंडळांनी खबरदारी म्हणून गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
विघ्नहर्त्या, कोरोनाचे संकट लवकर दूर कर!
कागल, दि.२२:हे विघ्नहर्ता गणपती देवा! कोरोनाच्या जागतिक महामारीचे हे संकट लवकरात लवकर दूर कर, असे साकडे श्री गणरायाला घातले. कागलच्या कोविड केअर सेंटरमध्ये दीड दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना व श्री गणरायाची आरती केली. pic.twitter.com/zXlHx0HHt1— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) August 22, 2020
महत्वाच्या बातम्या-
6 तासांपेक्षा अधिक वेळ सीबीआयद्वारे सुशांतच्या घराची तपासण
‘हो…दाऊद इब्राहिम आमच्याच देशात’; अखेर पाकिस्तानने दिली कबूल
राज्यात कोरोनाचा वाढता आकडा, पाहा आजची सविस्तर आकडेवार
दिल्ली-उत्तर प्रदेशात बॉम्ब स्फोटाचा कट; पकडलेल्या आयसीसच्या अतिरेक्याचा मोठा खुलासा
प्रवासी, मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीबाबत केंद्राचा मोठा निर्णय