बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्यात, किटल्यांना थंड करण्याचाच हा प्रकार” 

मुंबई | नुकतंच मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक मोठ्या नेत्यांची सुट्टी करण्यात आली. तर अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देखील देण्यात आली आहे. तर काही नेत्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. या विषयावर सामना अग्रलेखातून शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारावर प्रखर विश्लेषण करून भाजपवर टीका केली आहे.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास शिवसेनेने मेगा सर्जरीची उपमा दिली आहे. ही खरोखरच सर्जरी असती तर अर्थमंत्री व विदेश मंत्र्यांना सगळ्याच आधी घरी पाठवले गेले असते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा, परराष्ट्र व्यवहार नीतीचा आज जो बोजवारा उडाला आहे. तो असा याआधी कधीच उडाला नव्हता, पण पंतप्रधानांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचाच राजीनामा घेतला. पण मेणबत्त्या पेटवून, थाळ्या वाजवून कोरोना पळवा, असं सांगण्यापर्यंतचे निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतले नव्हते, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

ज्येष्ठ मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांना वगळणे हा धक्काच आहे. जे खाते पी. व्ही. नरसिंह राव, अर्जुन सिंग, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या तज्ञांनी सांभाळलं होतं, ते पोखरीयाल यांना देताना भान ठेवायला हवं होतं. पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांना दिलं. गोयल यांना हा धक्काच आहे. चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्या होत्या. त्या किटल्यांना थंड करण्याचाच हा प्रकार आहे, अशी खोचक टीका शिवसेनेने केली आहे.

दरम्यान, एक तर नव्या मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य हे मूळ भाजप किंवा संघपरिवाराचे नसून लाटेबरोबर वाहून किनाऱ्याला लागलेले ओंडकेच आहेत, अशी खोचक टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. शिक्षणातील गोंधळ, महागाई, बेरोजगारीची खडखड यावर उतारा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसून आपल्याच टेबलावर ठेवले आहेत. या मंत्रिमंडळ फेरबदलाचे वैशिष्ट्य काय?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

एकनाथ खडसेंची तब्बल 9 तास ईडी चौकशी; चौकशीला खडसेंचा सकारात्मक प्रतिसाद

…म्हणून त्या 12 मंत्र्यांचा राजीनामा घेतला- नरेंद्र मोदी

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीला ‘आनंद पोटात मायेना’; शेअर केली खास पोस्ट!

देशात कोरोनाची तिसरी लाट???; या राज्यात गेल्या 10 दिवसांमध्ये रूग्णसंख्या 12,000 ने वाढली!

“आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं, तुम्हीही एकत्र येऊन पुणे महापालिकेवर महाविकास आघाडी आणायला हवी”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More