Top News आरोग्य

पावसाळा घेऊन येतो कंबरदुखी; वाचा कारणं आणि करा उपाय

पावसाळा सुरु झाल्यापासून अनेकांना वेगवेगळे अवयव दुखण्याचा त्रास सुरु होतो. उदा. सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी इत्यादी. पावसाळ्यात ही दुखणी वाढण्याचं कारण आहे वातावरणातील गारवा, यामुळे शरीरातील वातदोष निसर्गताच वाढतो आणि उन्हाळ्यात बंद असलेली किंवा कमी झालेली जुनी दुखणी पुन्हा नव्यावं सुरु होतात. या सगळ्यांमध्ये कंबरदुखी अनेकांना जास्तच त्रासदायक ठरते. कंबरेचं दुखणं असं आहे जे तरूणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना त्रासदायक ठरतं. समाजातील ९०% स्त्रिया कंबरदुखीने त्रस्त आहे. आता मात्र स्त्रियांसह पुरुषांमध्ये देखील कंबरदुखीचं प्रमाण वाढत आहे.

सुरुवातीला कमी त्रास होत असतांना अनेक स्त्रिया व पुरुष हा त्रास अंगावर काढतात. परंतु असे केल्याने त्रास दिवसेंदिवस वाढत जातो. म्हणून वेळीच उपचार केलेले योग्य व फ़ायद्याचे ठरते.

कंबरदुखीची काही कारणं आहेत ती खालीलप्रमाणे-

स्त्री-वर्गात आढळणारी कारणे-

१. स्त्रियांमध्ये (गृहिणी) घरकामाचा पडणारा ताण, सतत वाकून काम करणे, जड वस्तू उचलणे, पाणी भरणे इ.
२. अनेक स्त्रियांमध्ये कंबरदुखी गर्भाशयाशी संबंधित आजार किंवा आजाराचे लक्षण म्हणून आढळून येते. जसे अंगावरून पांढरे जाणे (श्वेतप्रदर), मासिक पाळीच्या संबंधित तक्रारी असणे इत्यादी.
३. कंबरदुखीचं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे स्थूलपणा. स्त्रियांमध्ये स्थूलता वाढली कि कंबरदुखीचा त्रास सुरु होतो.
४. अनेक स्त्रियांमध्ये डिलीवरीनंतर कंबरदुखी सुरु होते. सिझेरियन करताना देण्यात येणारी भूल हे अनेकांसाठी कंबरदुखीचं कारण झालं आहे.
५. रोज प्रवास करणाऱ्या स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास लवकरच जडतो.
६. सतत उभ राहून काम केल्याने कंबरदुखीचा त्रास लागतो.

पुरुष वर्गात आढळणारी कारणे-

१. पुरुषांमध्ये कंबरदुखीचं मुख्य कारण म्हणजे वाढत जाणारा पोटाचा आकार. जसजसा पोटाचा घेर वाढेल तसतसे पाठीच्या मणक्यांवर ताण पडतो व कंबर-पाठदुखी लागते.
२. दिवसेंदिवस वाढत जाणारा प्रवास हे एक कारण जास्त प्रमाणात आढळून येते. दुचाकीने प्रवास केल्याने कंबरेला व पाठीच्या मणक्यांना बसणारे दणके कंबरदुखीचं कारण ठरते. सतत व दूरच्या प्रवासाने पाठीच्या मणक्यांना दणके लागून दोन मणक्यांमधील अंतर वाढणे किंवा कमी होणे, मणक्यांना सूज येणे, दोन मणक्यांमधील गादी बाहेरील बाजूस सरकणे किंवा गादी दाबली जाणे या कारणांनी कंबरदुखी सुरु होऊ शकते.
३. चारचाकी वाहनातून सतत प्रवास करणारे उदा. बस चालक, बस कंडाक्टर, अवजड वाहनांचे चालक यांना कंबरदुखी, मणक्यांचे दुखणे याचा त्रास होतोच.
४. सतत एकाच जागेवर बसून काम करणाऱ्यांना सुद्धा कंबरदुखीचा त्रास जडतो. बैठेकाम, बैठक व्यवस्था योग्य नसल्यास, हालचाल न करणे, व्यायामाचा अभाव, सतत AC चालू असणे याने कंबरदुखी जडते.

अतिश्रम करणारे-

१. सतत पाठीवर ओझी वाहून नेणाऱ्यांमध्ये मणक्यांचे व कंबरेचे दुखणे सुरु होते. (उदा. गॅस सिलिंडर, धान्याचे पोते, मोठे खोके इ.)

उंचीवरून पडण्याने मार लागल्यास कंबरदुखी चा त्रास होतो.

कंबरदुखीवर उपाय काय आहे???

कंबरदुखी हाडाच्या (मणक्यांच्या) विकृतीमुळे आहे की स्नायूंच्या विकृतीमुळे याचे योग्य निदान डॉक्टरांकडून करणे व योग्य चिकित्सा घेणे आवश्यक आहे.

चिकित्सा-

१. औषधोपचार- डॉक्टरांच्या सल्ल्याने

२. पंचकर्मोपचार- वाताच्या आजारांवर पंचकर्मातील ’बस्ती’ चिकित्सा हि अतिशय महत्वाची व पहिली चिकित्सा सांगितलेली आहे. वात दोषामुळे होणाऱ्या सर्व आजारांवर विशेषत्वाने उपयोगी पंचकर्मोपचार आहे. त्यानंतर स्नेहन, स्वेदन हे पंचकर्मातील एक उपक्रम असून याने वाताच्या आजारांत चांगला फायदा मिळतो.

बस्ती- ज्या उपक्रमात गुदमार्गाद्वारे औषधी काढे, सिद्ध तेल, औषधी सिद्ध दुध, मांसरस इ. द्रव्ये शरीरात प्रविष्ट केले जातात त्यास बस्ती म्हणतात. प्रधानतः वात दोषावरिल महत्वाची चिकित्सा.

स्नेहन – ज्या शास्त्रोक्त प्रक्रियेत रुक्षता घालवण्यासाठी व स्निग्धता आणण्यासाठी तेल/तूप यांचा शरीरातून किंवा शरीराबाहेरुन उपयोग केला जातो त्यास स्नेहन असे म्हणतात.
– आभ्यंतर स्नेहन- औषधी वनस्पती सिद्ध तेल/तूप सेवन करणे.
– बाह्य स्नेहन- शरीराला बाहेरुन तीळ तेल/ औषधी वनस्पती सिद्ध तेल लावणे.

स्वेदन- ज्या क्रियेमध्ये शरीराचा जडपणा, जखडलेले अवयव व शरीरातील वात यांचा नाश केला जातो किंवा कमी केले जातात त्यास स्वेदन असे म्हणतात. स्वेदन उपक्रमात जडपणा, जखडलेले अवयव यांना औषधी युक्त पाण्याची वाफ़ दिली जाते.

· अग्निकर्म
· विद्धकर्म

३. योग व प्राणायाम सल्ला-
उदा. सूर्यनमस्कार, भुजंगासन
याचा उपयोग करून कंबरदुखीवर उपचार केले जातात.

आपल्याला कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर आजच खालील मोबाईल क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा आणि योग्य आयुर्वेदिक उपचार करुन घ्या.

– डॉ. अश्विनी पाटील ( लेखिका आयुर्वेदात एमडी आहेत.)

श्री. सर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर
फ्लॅट नं. 9, कुदळे अपार्टमेंट, न्यू निखील सुपर मार्केटच्या वर
माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे. फोन नं- 8275536054

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या