Artificial Intelligence l आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक प्रभावी तंत्रज्ञान आहे, पण ते सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकत नाही. विशेषतः संवेदनशील आणि नैतिक प्रश्नांवर एआय (AI) कडून मिळणारी माहिती नेहमीच विश्वसनीय असेल, असे नाही.
एआय (AI) वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. गोपनीयतेचा भंग करणारी माहिती, हॅकिंग किंवा बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित प्रश्न विचारणे टाळावे. एआय (AI) कडून अशी माहिती मिळण्याची शक्यता कमी असली, तरीही धोका संभवतो.
वैयक्तिक माहिती, जसे की पासवर्ड किंवा बँकेचा तपशील, एआय (AI) ला कधीही देऊ नये. कारण एआय (AI) प्रणाली हॅक झाल्यास, या माहितीचा गैरवापर होऊ शकतो.
एआय (AI) ला जातीय तेढ निर्माण करणारे, हिंसा किंवा द्वेष पसरवणारे प्रश्न विचारू नयेत. तसेच, आरोग्याच्या समस्यांवर उपाय किंवा ऐतिहासिक घटनांबद्दल चुकीची माहिती देणारे प्रश्न विचारणे टाळले पाहिजे.
एखाद्या व्यक्ती किंवा ब्रँडबद्दल खोटे दावे करणे किंवा खोटी माहिती पसरवणे, यासाठी एआय (AI) चा वापर करणे चुकीचे आहे. एआय (AI) हे तंत्रज्ञान असले, तरी त्याचा वापर जबाबदारीने आणि योग्य पद्धतीने करायला हवा.
News title : Artificial Intelligence (AI): Limitations and Risks