नागपूर | नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सध्या अरूण गवळीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
कोरोनाची लागण झाल्यापासून अरूण गवळीची प्रकृती सातत्याने खालावत आहे. अरूण गवळीला उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलंय.
काही दिवसांपूर्वी अरूण गवळीची प्रकृती खराब झाली होती. तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी गवळी आणि इतर कैद्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये अरूण गवळीसह पाच कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर आज सकाळी अरूण गवळीची प्रकृती खालावल्याने गवळीला मेडिकलमधील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आल्याचं कळतंय.
दरम्यान, अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुलै महिन्यात 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. त्याच्या काही दिवस आधीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे.
थोडक्यात बातम्या-
हनिमूनच्या रात्री नवऱ्याचं वागणं पाहून नवरीही हैराण, प्रकार पाहून तुम्हीही चकीत व्हाल!
“मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे, त्यामुळे मला काही अडचण येत नाही”
न्यूज चॅनेलवर बोलताना तोल सुटला, भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तुफान राडा!
सावधान ! ‘या’ सवयी असतील तर तुम्हीही लवकरच म्हातारे व्हाल, वाचा सविस्तर
बापरे… रिषभ पंतच्या फलंदाजीला घाबरुन हा खेळाडू सोडणार होता क्रिकेट!
Comments are closed.