बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फोटो फिचर | अरुण गवळीच्या लेकीच्या लग्नाचे फोटो पाहिले का?

गँगस्टर अरुण गवळीची लेक योगिताचा विवाहसोहळा शुक्रवारी पार पडला. अभिनेता अक्षय वाघमारेसोबत ती विवाहबंधनात अडकली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला. दगडी चाळीत या निमित्ताने आनंदाचं वातावरण पहायला मिळालं.

लॉकडाऊन असल्यामुळे अरुण गवळीने आपल्या लेकीच्या विवाहासाठी मुंबई आणि पुणे पोलिसांची परवानगी घेतली होती. या परवानगीनेच हा विवाहसोहळा पार पडला. अत्यंत जवळच्या लोकांना या विवाहासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लग्नसोहळ्यात खास काळजी घेण्यात आली. सर्वच वऱ्हाडी मंडळींनी मास्क परिधान केला होता तसेच सॅनिटायझरचा वापरही करण्यात आला. सोशल डिस्टंन्सिंगचही यावेळी पालन करण्यात आलं.

अक्षय वाघमारे नवोदित मराठी अभिनेत्यांमधलं एक चांगलं नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामध्ये ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ ‘फत्तेशिकस्त’ अशा अनेक मराठी चित्रपटांचा समावेश आहे.

अरुण गवळीची मुलगी योगिता ही महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी काम करत आहे तसेच ती चित्रपटक्षेत्राशी देखील निगडीत आहे.  तिने स्वतः काही चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.

अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही घरच्या मंडळींनी त्यांच्या या विवाहाला संमती दिली.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात योगिता आणि अक्षय यांचा साखरपुडा झाला होता. २९ मार्च २०२० ही लग्नाची तारिख ठरवण्यात आली होती, मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने २९ मार्च रोजी हा लग्नसोहळा होऊ शकला नाही.

लॉकडाऊनमुळे हा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला होता. दोन्ही कुटुंबाच्या चर्चेतून तो ८ मे रोजी थोड्याच लोकांच्या उपस्थितीत करण्याचं ठरलं त्यासाठी प्रशासनाकडून परवानगी देखील घेण्यात आली.

प्रशासनाच्या परवानगीनंतर निवडक लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. नववधू-वरांना अरुण गवळी पती पत्नीसह उपस्थितांनी आशीर्वाद दिले.

आता थोड्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला असला तरी अनेकांची या लग्नाला उपस्थित राहण्याची इच्छा होती, त्यामुळे लाॉकडाऊन उठल्यानंतर रिशेप्शनचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More