मुंबई | अरूण गवळी याच्या मुलीचं आज अतिशय साध्यापद्धतीने अभिनेता अक्षय वाघमारेसोबत लग्न पार पडलं. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून दगडी चाळीत हे लग्न संपन्न झालं.
लॉकडाऊनमुळे सगळीकडेच बंदी आहे. अखेर मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेतल्यानंतर मुंबईतील दगडी चाळीत योगिता आणि अक्षय विवाहबद्ध झाले.
योगिता आणि अक्षयचा विवाहसोहळा हा अतिशय साधेपद्धतीने करण्यात आला. डिसेंबरमध्ये साखरपुडा झालेल्या या दोघांच लग्न 29 मार्च रोजी मुंबईतील लोअर परेल परिसरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये होणार होतं. मात्र लॉकडाऊनमुळे ते पुढे ढकलण्यात आलं.
दरम्यान, गुरूवारी संध्याकाळी या दोघांच्या हळदीचा कार्यक्रम एकत्रच पार पडला. अभिनेता अक्षय वाघमारेची आई-वडिल या लग्नासाठी पुण्याहून मुंबईत आले. अतिशय साधेपद्धतीने हा सोहला पार पडला.
ट्रेंडिंग बातम्या-
मुंबईतील ‘या’ 18 वर्षीय तरुणाच्या कंपनीत रतन टाटांकडून गुंतवणूक
दिग्गजांना बाजूला सारत भाजपने विधानपरिषदेसाठी 4 उमेदवार केले जाहीर!
महत्वाच्या बातम्या-
खडसे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील- चंद्रकांत पाटील
पतीची कामगिरी खराब झाली तरी दोष पत्नीवरच येतो- सानिया मिर्झा
दारूविक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’चा विचार करावा; सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना सूचना
Comments are closed.